Description
गेल्या सुमारे तीन दशकांपासून विषेशतः ज्येष्ठ मध्यमवर्गीयांच्या जीवनात लक्षणीय बदल जाणवू लागला आहे. जागेची टंचाई, दोन पिढ्यांमधील जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन अशा अनेक कारणांमुळे एकत्र कुटुंब पद्धतीची जागा विभक्त कुटुंब पद्धतीने घेतली आहे. अशातच स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यासाठी, उज्वल भवितव्याचा विचार करून तरूण पिढी वैयक्तिक उत्कर्ष साधण्याच्या हेतूने परदेशात शिक्षण व जमल्यास तेथेच कायम वास्तव्य करू लागली आहे. • पालकांनी मात्र आपल्याच देशात राहणे पसंत केले आहे.
औषध उत्पादनाच्या क्षेत्रात व रोग निदान व निवारणाच्या क्षेत्रांत विज्ञानाने केलेल्या प्रगतीमुळे मनुष्याची आयुर्मर्यादा लक्षणीयरीत्या वाढली आहे. तथापि वाढत्या वयाबरोबर स्वतःच्या दैनंदिन गरजा भागविण्याकरिता अनंत अडचणींना त्यांना तोंड द्यावे लागत आहे. एकटेपणा बरोबरच असुरक्षिततेची जाणीव सुद्धा वाढत असल्याने वयस्कर मंडळीची वाटचाल नैराश्याकडे होत आहे असे दिसून येते.
ह्या सर्व समस्यांचे समाधान बहुधा एका चांगल्या ‘वृद्धनिवासांत’ (वृद्धाश्रम नव्हे) असूं शकते ह्या मनोधारणेने सर्व शक्याशक्यतांचा सखोल अभ्यास करून वृद्धनिवासाची कल्पना साकार करण्याचा निर्णय संस्थेने घेतला व त्याची परिणती आजच्या कै. अण्णासाहेब बेहरे जेष्ठ (वृध्द) निवासाच्या रूपाने आपल्या समोर झाली आहे. ज्येष्ठ मध्यमवर्गीयांच्या सर्वसाधारण गरजा, खाण्यापिण्याची आवड व काही आधुनिक सोई सुविधा लक्षांत घेऊन त्या पुरविण्याचा प्रयत्न पहिल्या दिवसापासून संस्था करीत आहे.
Contact Information
Contact Listings Owner Form
Annasaheb Behere Old Age Home 0 reviews
Login to Write Your ReviewThere are no reviews yet.